Tuesday, September 21, 2010

हुशार विद्यार्थी (?)

वर्तमानपत्रात कुठल्याही विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल काही छापून आलं की माझी आई ते मला मुद्दाम वाचून दाखविते मग त्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा, त्या विद्यार्थ्यांना काहीच साधन उपलब्धता नसताना त्यांनी मिळविलेलं अपार यश आणि त्या तूलनेत माझ्याकडे सारं काही असताना मी कसा अपयशी वगैरे गुर्‍हाळ दोन चार दिवस तरी आमच्या घरी चालतंच.

एकदा असंच पेपरात नाव आलं कचरू वाघ या विद्यार्थ्याचं. या गरीब विद्यार्थ्याने दिवसभर कष्टाची कामे करून, रात्रशाळेत अभ्यास करून बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविलं होतं. झालं.. कचरूच्या नावाचा जप आमच्या घरी चालु झाला. अर्थात ह्यावेळी जप दोन दिवसातच थांबला कारण वर्तमानपत्राच्या पुढच्याच अंकात बातमी आली ती अशी की कचरूने स्वत: पेपर लिहीलेच नव्हते तर स्वत:ऐवजी पूर्णवेळ शिक्षण घेतलेल्या एका हुशार अल्पवयीन विद्यार्थ्याकडून ते लिहून घेतले होते.

पुढे काही काळानंतर अशीच एका पुण्यातल्या विद्यार्थिनीची (तिचं नाव आता आठवत नाही) बातमी आली - ती सीए ची परीक्षा पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याची. तिचे लगेच सत्कार वगैरे ही झाले पण दोन दिवसानंतर उघड झालं की ती प्रत्यक्षात अनुत्तीर्ण झाली होती तरी तिने खोटे निकालपत्र वगैरे गोष्टी अगदी व्यवस्थित पैदा केल्या व सर्वांना दोन दिवस चकविले.

या सर्वांवर कडी म्हणजे विद्या प्रकाश काळे ही युवती. ही प्रत्यक्षात खरोखरच अतिशय हुशार आहे. आता ही साधारण पस्तीशीची असेल पण वयाच्या जेमतेम अठराव्या वर्षापासून ती चोर्‍या करण्यात पटाईत आहे. वेळोवेळी तुरूंगात ही गेली आहे तर अनेकदा पोलिसांना तिने गुंगारा ही दिला आहे. आता तिने स्वत:ची मोठी टोळीही स्थापन केली आहे. तुरूंगातील वास्तव्यात तिने आपल्या हुशारीच्या जोरावर कायद्याचे शिक्षणही पूर्ण केले आहे. अर्थात वकील झाल्यावर ती पुढे अनेकदा पोलिसांकडून पकडली गेली असली तरी तिला फारशी कडक शिक्षा होऊ शकली नाही याचे सारे श्रेय तिच्या वकिली कौशल्याला जाते.

तिच्या विषयीची एक बातमी तुम्ही इथे वाचू शकता :-

http://72.78.249.126/esakal/20100522/5736895754452919648.htm

इतर अनेक चोर्‍यांप्रमाणे हिने वय देखील चोरलेले दिसतंय.. बातम्यांमध्ये वय कमी दाखवलंय..

http://www.punenews.net/2010/05/lawyer-woman-run-gang-arrested-for.html

http://www.expressindia.com/latest-news/woman-among-five-arrested-for-robbery-plot/621283/

http://news.in.msn.com/crimefile/article.aspx?cp-documentid=3924613&page=10

http://news.indiainfo.com/c-83-144953-1263496.html

विद्याचा सुरूवातीच्या काळातील पराक्रम (मोटरसायकलकरिता लहान मुलीचे अपहरण):-

http://www.indianexpress.com/ie/daily/19971213/34750503.html

No comments:

Post a Comment