Tuesday, September 21, 2010

डोळ्यात येते पाणी

१९६२ साली आपण चीन सोबत चे युद्ध हारलो तरी आपले जे जवान सीमेवर लढले त्यांचे मनोधैर्य उंचावण्याकरिता आणि जे रणांगणात शहीद झाले त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरिता सरकारी पातळीवर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्या समारंभाला साजेसे एक गीत बसविण्याची जबाबदारी संगीतकार सी. रामचंद्र यांच्यावर देण्यात आली. हे गीत लता मंगेशकर गाणार हे निश्चित झाले तरी ते लिहीणार कोण हा प्रश्न होताच. तेव्हा सर्व नामवंत गीतकार चित्रपटासाठी गीत लिहीण्यात व्यग्र होते अचानक सी. रामचंद्र यांच्यासमोर कवी प्रदीप यांचे नाव आले. कवी प्रदीप यांच्या तत्वज्ञानानी भारलेल्या गीतांना व्यावसायिक चित्रपटात फारशी मागणी नव्हती त्यामुळे सी. रामचंद्रांनी त्यांचेकडून बरेच दिवसात कुठलेही गीत लिहून घेतले नव्हते. जेव्हा या सरकारी कार्यक्रमाकरिता गीताची मागणी रामचंद्रांनी प्रदीप यांचेकडे केली तेव्हा कवी प्रदीप उसळून म्हणाले, "मानधन मिळायचे असेल तेव्हा तुम्हाला माझी आठवण येत नाही आणि अशा फुकटछाप सरकारी कार्यक्रमाकरिता मी गीत लिहून द्यावे असा तुमचा आग्रह का? मी हे काम मुळीच स्वीकारणार नाही."

मोठ्या कष्टाने सी. रामचंद्र यांनी कवी प्रदीप यांची समजूत काढण्यात यश मिळविले आणि सरतेशेवटी त्यांच्याकडून एक लांबलचक गीत लिहून घेतलेच. ऐ मेरे वतन के लोगो, जरा आंखमे भरलो पानी या गीताची ही सून्न करणारी बाजू काही वर्षांपूर्वी लोकसत्तात वाचली आणि एका वेगळ्याच अर्थाने डोळे भरून आले.

No comments:

Post a Comment