Wednesday, December 29, 2010

नाण्याची दुसरी बाजू अर्थात Behind Every Crime There Is An Injustice

काही काळापूर्वी मी शालेय विद्यार्थ्यांची शिकवणी घेत होतो तेव्हाची गोष्ट.  माझ्याकडे येणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये सातवीत शिकणारा वरद नावाचा एक चुणचुणीत मुलगा होता.  तो अतिशय जिज्ञासू आणि अभ्यासू असल्याचे माझे निरीक्षण होते.  एकदा मात्र इतिहासाचा विषय निघाला असता तो अचानक काही कारणाने  उत्तेजित झाला.  इंग्रजांनी आपल्यावर अनन्वित अन्याय अत्याचार केले असून तिथे जाऊन आपणही त्यांचा तशाच प्रकारे बदला घेतला पाहिजे.  इंग्लंडमध्ये जाळपोळ करून तो देशच नष्ट केला पाहिजे वगैरे, वगैरे.  त्याला आधी मी शांत होण्यास सांगितले.  नंतर थोड्या वेळाने मी त्याला त्याचे विचार ऐकून मला कुठलाही धक्का बसला नसल्याचे सांगितले.  बर्‍याच वर्षांपूर्वी माझेही असेच काहीसे विचार होते परंतू ते कालांतराने पूर्णत: बदलले असल्याचेही सांगितले.  माझ्या विचारांमध्ये असे परिवर्तन नेमके कशामुळे घडून आले हे जाणण्यास वरद उत्सुक होता.  त्याला मी हा सारा घटनाक्रम थोडक्यात समजावून सांगितला तो अशा प्रकारे -

मी तिसरीला असताना आम्हाला शालेय अभ्यासक्रमात थोरांची ओळख हे पुस्तक इतिहास या विषयाकरिता होते.  या पुस्तकात दादाभाई नौरोजी, लाला लजपतराय, गोपाळ कृष्ण गोखले, जोतिबा फुले, बाळ गंगाधर टिळक, मोहनदास करमचंद गांधी, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, वल्लभभाई पटेल, चित्तरंजन बोस इत्यादी स्वातंत्र्यपूर्व काळातील नेत्यांची सचित्र माहिती नमूद केलेली होती.  बहुतेक पाठांमध्ये इंग्रजांनी भारतीयांवर केलेल्या जुलूम, अत्याचारांचे अंगावर शहारे आणणारे वर्णन होते.  विशेषत: लाला लजपतराय यांनी सायमन कमिशनचा काळे ध्वज दाखवून आणि सायमन गो बॅक अशा घोषणा देऊन निषेध केला होता तेव्हा त्यांना इंग्रजांनी छातीवर दंडुक्यांनी मारहाण केली, त्यात ते गंभीर जखमी झाले आणि त्यातच त्यांचा अंत झाला वगैरे वाचून तर मी फारच अस्वस्थ झालो.  तेव्हा रात्र रात्र मला झोप येत नसे.  इंग्लंड अतिशय क्रूर, दुष्ट लोकांचा देश आहे.  कुठल्याही प्रकारे त्या देशात घुसून तेथील वीजवाहक तारांना आगी लावून तो देश नष्ट केला पाहिजे (वीजवाहक तारांना आग लागल्यास ती आग  जिथे जिथे तारा पोचल्या आहेत अशा सर्व ठिकाणी फार वेगाने पसरते इतपत सामान्य ज्ञान मला त्या वयात होते) वगैरे विचारांनी मी अतिशय तळमळत असे.  एकतर असे काही करणे मला तेव्हा (आणि आजदेखील) अजिबात शक्य नव्हते. शिवाय हे असे स्फोटक (?) विचार कुणाला बोलून दाखवायची देखील सोय नव्हती.   त्यामुळे दिवसेंदिवस माझी बेचैनी वाढतच होती.

तशातच माझ्या एका मित्राची बहीण जी जळगावला राहत होती, काही कारणास्तव पुण्याला राहायला आली.  तीदेखील जळगावात तिसर्‍या इयत्तेतच शिकत होती.  अर्धे शैक्षणिक वर्ष जळगावच्या शाळेत व्यतीत केल्यावर तिने पुण्यातल्या शाळेत जेव्हा प्रवेश घेतला तेव्हा आमच्या वर्गशिक्षिकेने (तेव्हा आम्हाला सर्व विषय शिकवायला एकच शिक्षिका होत्या) तिची इतर सर्व विषयांची पुस्तके बरोबर आहेत परंतू भूगोलाचे पुस्तक मात्र नव्याने विकत घ्यावे लागेल असे तिला सांगितले.  तिच्याजवळ असलेले भूगोलाचे पुस्तक न चालण्याचे नेमके कारण काय असावे या कुतूहलापोटी मी ते पुस्तक पाहू लागलो आणि आपल्याच जगात वावरणार्‍या त्या वयातल्या मला धक्काच बसला.  तिच्या भूगोलाच्या पुस्तकावर लिहिले होते आपला जळगाव जिल्हा.  आम्हा सर्वांच्या भूगोलाच्या पुस्तकावर लिहीले होते आपला पुणे जिल्हा.

विचारांचा धक्का विजेच्या धक्क्यापेक्षाही तीव्र असतो असे म्हणतात.  मलादेखील ह्या वैचारीक धक्क्याचा मोठा परिणाम जाणवला.  यानंतर माझी विचार करण्याची दिशाच बदलून गेली.  प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन अमूलाग्र बदलला.  म्हणजे कसे ते पाहा - जळगाव पुण्यापासून साधारण चारशे किमी लांब आहे.  पुण्यातले विद्यार्थी तिसरीच्या भूगोलात पुणे जिल्ह्याचा अभ्यास करतात तर जळगावचे विद्यार्थी जळगावचा.  चौथीत दोघांचा भूगोल समान असणार कदाचित कारण चौथीत महाराष्ट्राचा अभ्यास आहे पण तेव्हा दुसर्‍या राज्यात पुन्हा वेगळाच भूगोल असणार.  पाचवीत तोदेखील समान असेल कारण संपूर्ण भारताचा तेव्हा भूगोलाच्या अभ्यासात समावेश आहे पण दुसर्‍या देशाचे विद्यार्थी त्यांच्याच देशाचा अभ्यास करतील.  पुढे जेव्हा वरच्या इयत्तेत जगाचा भूगोल शिकविला जाईल तेव्हा कदाचित सर्व जगातल्या विद्यार्थ्यांचा भूगोल समान असूही शकेल पण मग इतिहासाचे काय?

प्रत्येक देश / प्रांत /  राज्य विद्यार्थ्यांना स्वत:चा इतिहास शिकवतील पण आंतरराष्ट्रीय इतिहास शिकवायची वेळ येईल तेव्हा ते सार्‍या गोष्टी स्पष्टपणे मांडू शकतील काय? शंकाच आहे.  इंग्लंडच्या विद्यार्थ्यांना इतिहासात असे शिकविले जाईल का की आपण भारतावर राज्य केले, त्या देशाला गुलामगिरीत जखडले, तेथील जनतेवर अन्याय, अत्याचार, जुलूम जोर जबरदस्ती केली वगैरे, वगैरे.  अर्थातच अशी कोणतीही शक्यता नाही.  उलट तिथल्या विद्यार्थ्यांना अशी माहिती पुरविली जात असणार की भारत हा एक अति मागासलेला देश होता.  त्यास इंग्लंडच्या राज्यकर्त्यांनी नवीन तंत्रज्ञान, लोकशाही वगैरे बाबी शिकवून एक विकसनशील देश म्हणून उभे केले व त्या बदल्यात भारताच्या जनतेने कृतघ्नपणे इंग्रज अधिकार्‍यांना हाकलून लावले इत्यादी, इत्यादी.  म्हणजेच आपण म्हणणार की ते चूकीचा इतिहास शिकवित आहेत.  मग कशावरून आज आपण आपल्या विद्यार्थ्यांना जो इतिहास शिकवित आहोत तो खरा आहे? शंभर टक्के प्रामाणिक आहे?

त्यानंतर मी कुठल्याही गोष्टीकडे फारसे उत्तेजित न होता पाह्यचे ठरविले.  ह्याचे कारण आपणांस जी माहिती प्रथम पुरविली जाते, कालांतराने त्याच्या अगदी उलट माहिती तितक्याच ठामपणे आपल्या समोर येते.  उदाहरणार्थ, मोहनदास करमचंद गांधींविषयी शालेय जीवनात अगदी पाचवीपर्यंत मला अतिशय छान, आदर वाटावा अशी माहिती अभ्यासातून, इतर व्याख्यानातून मिळत होती पण पाचवीत मी गोपाळ गोडसेंचे पंचावन्न कोटींचे बळी हे पुस्तक वाचले.  ह्या पुस्तकात गांधींविषयी माझ्या पूर्वीच्या माहितीला छेद देणारी अतिशय वेगळीच माहिती वाचनात आली.  यानंतर पुढे अनेक ठिकाणी गांधींविषयी उलट सुलट लिहिलेले आढळले.  नेमका कशावर विश्वास ठेवायचा?

पुढे मी सातवीत असताना बाळासाहेब भारदे यांचे व्याख्यान ऐकले.  ते म्हणाले, "तुम्ही भारताचे नागरीक आहात काय?  भारताचा नागरीक असणे म्हणजे पाकिस्तानचा द्वेष करणे असे जर तुम्हाला वाटत असेल तर माझे तुम्हाला कळकळीचे सांगणे आहे की तुम्ही भारताचे नागरीक होऊ नका.  विश्वाचे नागरीक व्हा.  तुम्हाला तुमच्या पूर्वजांनी शिकविलेला सर्वच इतिहास खरा असेलच असे नाही.  शेजारी राहणार्‍या दोन कुटुंबांमध्ये भांडणे असतील तर प्रत्येक कुटुंबातले आईवडील त्यांच्या मुलांना आपण कसे बरोबर आहोत आणि आपल्या शेजारचे कसे चूक आहेत हेच शिकवित राहणार.  आता यात खरे काय आणि खोटे काय?  वस्तुस्थिती माहित नसणारी त्या कुटुंबातली मुले तेच वैर पुढे वाढवित राहणार.  शेजारी असणार्‍या दोन राष्ट्रांबाबतही अशीच परिस्थिती आहे.  तुम्ही नव्या पिढीचे प्रतिनिधी आहात.  पुर्वग्रहदूषित विचारसरणी बाळगून शत्रूभाव जपण्यापेक्षा खुल्या मनाने विचार करा.  भूतकाळात कोणाची चूक होती हे शोधण्याचा प्रयत्न करू नका.  कदाचित खरे काय ते तुम्हाला कधीच कळणार नाही.  दोन्ही बाजूचे आपापल्या परीने आपण सांगतोय तेच सत्य असे भासवायचा प्रयत्न करतील.  तेव्हा भूतकाळात कदाचित आपल्याही पूर्वजांकडून काही चूका झाल्या असण्याची शक्यता आहे हे समजून घ्या.  नव्याने संबंध प्रस्थापित करा तरच भविष्यात शांततेने जगणे शक्य होईल."  भारदेंच्या भाषणाने माझा ह्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टीकोन अधिकच व्यापक झाला.

याच दरम्यान हिंदू व मुस्लीम यांच्यात वैर कसे सुरू झाले ह्याविषयीची एक कथा माझ्या वाचनात आली ज्यामुळे आक्रमक धार्मिक युद्धांच्या मागची कारणे काय असू शकतील हे मला उमजले.  ती कथा थोडक्यात अशी - 

तर ही तेव्हाची गोष्ट आहे, जेव्हा हिंदु व मुस्लिम धर्मात वैर नव्हते. हिंदुंच्या राज्यात मुस्लिम व मुस्लिमांच्या राज्यात हिंदु राहत होते. असाच एक हिंदु मनुष्य मुस्लिम राजवटीच्या प्रदेशात राहत होता. कष्ट करून पोट भरणारा तो एक अतिसामान्य तरूण होता.
तो त्याच्या कामानिमित्त राजवाड्यासमोरील रस्त्यावरून जात असताना राजकन्या त्याला सज्जातून पाहत असे. असे पाहणे अनेकदा झाल्यावर तिला असे जाणवले की तिला तो आवडू लागला आहे. तिने आपल्या वडिलांना म्हणजेच त्या प्रदेशाच्या राजाला आपण त्या तरूणाशी विवाह करण्याची इच्छा बाळगून असल्याचे सांगितले.
राजाने अर्थातच या गोष्टीला संमती दिली नाही कारण हा तरूण एक सामान्य नागरीक होता. (धर्माचा मुद्दा राजाने मांडला नाही कारण राजाला त्याचा धर्मच माहित नव्हता. परंतू रस्त्यावरून पायी चालत जाणारा म्हणजे सामान्य व आपल्या तोलामोलाचा नक्कीच नाही हे त्याला सहज कळले)

परंतू काही दिवसातच राजाच्या लक्षात आले की राजकन्येने त्या तरूणाचा ध्यास घेतला आहे व तिचे सदर तरूणाशी लग्न लावले नाही तर ती सदैव दु:ख करीत राहील. शेवटी राजा एकदाचा तयार झाला. नाहीतरी त्याला ती एकुलती एक कन्या होती. तिच्या सुखाकरिता एवढी तडजोड करायला तो तयार झाला. त्याने सेवकांना सांगून त्या तरूणास बोलावून घेतले.
त्या तरूणाला राजाने राजकन्येची इच्छा बोलून दाखविली व तिच्या इच्छेप्रमाणे तिच्याशी विवाह करण्यास सांगितले.
त्या तरूणाला एवढे ठाऊक होते की या राजाचा आणि आपला धर्म एक नाही. त्याने या प्रस्तावास स्पष्ट नकार दिला. राजाला हा सरळ सरळ स्वत:चा अपमान वाटला. त्याचप्रमाणे राजकन्या कष्टी होईल याचीही कल्पना आली.
राजाने त्या तरूणाला ’राजकन्येशी विवाह कर’ असा हुकूम दिला अन्यथा सेवकांकरवी त्याचे प्राण घेण्याची धमकी दिली.
ही धमकी ऐकताच इतका वेळ आतल्या दालनात असलेली राजकन्या धावत दरबारात आली व तिने राजाला सांगितले की या तरूणावर कोणतीही जबरद्स्ती करू नये तो स्वेच्छेने तयार असेल तरच हा विवाह आयोजित करावा.

राजकन्येने दरबारात प्रवेश केला तसे एकदम चित्रच पालटले. मुख्य म्हणजे त्या तरूणाने तोपर्यंत कधी राजकन्येला पाहिलेच नव्हते. त्यामुळे राजकन्येचे प्रेम तसे पाहता एकतर्फीच होते. परंतु राजकन्येला त्याने दरबारात त्यावेळी पाहिले आणि तिचे अप्रतिम सौंदर्य पाहून तो ही तिच्या प्रेमातच पडला. आता काहीही करून हिच्याशी आपले लग्न झालेच पाहिजे असे त्यालाही वाटून गेले.
मग त्याने आपला लग्नासाठी आधी व्यक्त केलेला ठाम नकार रद्द करीत ’राजकन्या जर हिंदु धर्मात यायला तयार असेल तर मी लग्न करीन’ असा सशर्त होकार दिला.
राजाने ह्या अटीला संमती दिली. मग तो तरूण त्या राजकन्येला घेऊन स्थानिक हिंदु पंडिताकडे गेला. त्या पंडिताने राजकन्या म्लेंच्छ असल्याने तिला शुद्ध करून घ्यावे लागेल असे सांगितले. सदर शुद्धीकरण करण्यासाठी यज्ञाचे आयोजन व त्याकरिता आहुती / दक्षिणा आदींची मोठी मागणी केली. ती अर्थातच पुरविण्यात आली. त्यानंतर अनेक धार्मिक विधी / पुजा अर्चा करण्यात आल्या. या सगळ्या नंतर ही पुन्हा मोठे ग्रंथ / पोथ्या चाळून संदर्भ शोधण्यात आले आणि स्थानिक पातळीवर त्या राजकन्येचे शुद्धीकरण शक्य नसून तिला यापेक्षा मोठ्या धर्मपीठा समोर जाण्यास सांगण्यात आले.

 पुन्हा एक पातळी वर च्या धर्मपीठात ही याच गोष्टींची पुनरावृत्ती घडली. फक्त यावेळी आहुती / दक्षिणा यांच्या मागणीत वाढ झाली. शिवाय धर्मग्रंथ / पोथ्या यांच्या वाचनाकरिता पंडितांची संख्या जास्त होती त्यामुळे अर्थातच वेळही जास्त खर्च झाला. पण निष्कर्ष शेवटी तोच. राजकन्या शुद्ध होऊ शकत नाही
(जरा आठवून पाहिल्यास आपल्या असे लक्षात येईल -  ज्ञानेश्वरादी भावंडे - संन्याशाची मुले म्हणून अशुद्ध घोषित करण्यात आली व पुढे त्यांना शुद्ध करण्याच्या प्रक्रियेत अशाच काही गोष्टी घडल्या होत्या. असो.) 

 असे करता करता शेवटी सर्वोच्च अशा काशीक्षेत्री तो तरूण त्या राजकन्येला घेऊन पोचला. सदर वाटचाली दरम्यान ती राजकन्या त्या तरूणाची मनोभावे सेवा करीत होती या सर्व काळात त्याला तिच्यातील सौंदर्याशिवाय असण्यार्‍या इतर गुणांमुळेही ती अतिशय आवडू लागली. तिच्याशिवायआपण जगू शकणार नाही याची ही त्याला खात्री झालीच. काशीक्षेत्री काय फैसला होणार याचा अंदाज त्या तरूणाला आलाच होता. अर्थात अपेक्षेप्रमाणे तिथे देखील नकार घंटाच वाजली.
त्यानंतर ती राजकन्या व तो तरूण पुन्हा राज्यात आले व राजाला सर्व वृत्तांत कथन केला. राजा व राजकन्या या दोघांनी ही परिस्थिती पुढे नमते घेत विवाहाचा नाद सोडून दिला व त्या तरूणास निरोप देण्याची तयारी केली.

स्त्रिच्या प्रेमात मूलत:च एक त्यागाची भावना असते. त्यामुळे आपणाला आपले प्रेम मिळत नसल्यास त्या ते वास्तव चटकन स्वीकारतात. याउलट पुरूषांची लालसा त्यांना स्वस्थ बसू देत नाही. त्यांचे प्रेम हे ’हक्कप्रधान’ असते. ते मागणी करीत राहते.
इथे ही असेच घडले. तो तरूण च आता राजकन्येच्या प्रेमात पडला होता. रिकाम्या हातांनी परतणे त्याला शक्यच नव्हते. त्याने सरळ राजाला विचारले, " ही हिंदु होऊ शकत नसली तरी काय झाले? मी मुसलमान व्हायला तयार आहे. तुम्ही मला तुमच्या धर्मात घेऊ शकाल काय?"
राजाने ह्या गोष्टीला अत्यंत आनंदाने होकार दिला. मुस्लीम धर्मात प्रवेश करणे अतिशय सुलभ असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे मग तो तरूण मुस्लीम बनला आणि त्याने राजकन्येशी विवाह केला. त्यांचा संसार अतिशय सुखाचा झाला.
कालांतराने राजाने त्याचे राज्य आपल्या जावयाच्या सुपूर्त केले. आता हा नवीन राजा म्हणजे आपला कथानायक पुर्वाश्रमीचा हिंदु तरूण.. आणि याच्या प्रेमकहाणीतील त्यावेळचे खलनायक कोण तर हिंदुच्या धर्मपीठातील धर्म मार्तंड व तथाकथित आधिकारी व्यक्ति ... ज्यांनी आहुती / दक्षिणा वसूल करण्याखेरीज कुठलीही सश्रध्द क्रिया न करता आपल्या अधिकारात एका परधर्मीय निष्पाप तरूणीला हिंदू धर्मात येण्यास विनाकारण रोखून धरले होते.
तेव्हा या नवीन राजाने राज्यावर येताच आपल्या सैनिकांना हुकुम सोडला ....
"हिंदूंची देवळे तोडा.. लुटा... तेथील धर्मरक्षकांची कत्तल करा..."
त्यांनतर त्याने त्याच्या वारसांनाही हीच शिकवण दिली. आणि यानंतरच हिंद आणि मुसलमान या दोन धर्मात वैर सुरू झाले.
बाटगा जास्त कडवा असतो ही म्हण ही या घटनेनंतरच उदयास आली.
(कथा समाप्त)



सदर कथा मी रचलेली / लिहिलेली नाही. कोणाच्या भावना यामुळे दुखावल्यास मी जबाबदार नाही. त्याचप्रमाणे ही कथा कुठल्याही मुसलमान अथवा अन्य धर्मीय व्यक्तिने सांगितली नसून स्वातंत्र्य वीर विनायक दामोदर सावरकर यांनीच त्यांच्या एका भाषणात सांगितली होती.
सदर भाषणाचा वृत्तांत व ही कथा ’शतपैलू सावरकर’ (लेखक - ह. त्र्यं. देसाई) या पुस्तकात वाचण्यास मिळेल. ही कथा ज्या काळात घडली त्या काळात मी जन्मलो नसल्याने तिच्या सत्य / असत्यते विषयी मी काहीच भाष्य करू शकत नाही परंतू ती कथा त्या पुस्तकात असल्याचे व मी शाळेत असताना ती वाचल्याचे मला आठवते.


हे सर्व स्पष्टीकरण ऐकल्यावर वरदच्या विचारांमध्ये बराच फरक पडला. 

Tuesday, October 26, 2010

आणि धर्मराज युधिष्ठिरानेही अधर्माचीच साथ दिली

२००९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकांमध्ये कॊंग्रेसने मिळविलेल्या यशाला पंतप्रधानांनी केलेले मतदारांचे ब्लॆकमेलिंग कारणीभूत?




अंतर्गत लाथाळ्यांनी त्रस्त झालेल्या कॊंग्रेस - राष्ट्रवादी कॊंग्रेसला आपण पुन्हा निवडून येऊ शकू का ही चिंता सतावत होती पण ऒक्टोबर २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकांमध्ये महाराष्ट्रात या आघाडीत गेल्या वीस वर्षात मिळाल्या नाहीत इतक्या भरघोस जागा मिळविल्या आणि पुढच्या पाच वर्षांकरिता एका अतिशय स्थिर सरकारची स्थापना झाली पण   त्यांच्या यशामागचे रहस्य तसे दुर्लक्षितच राहिले. 

नेहमीप्रमाणेच यावेळीही प्रचारात अनेक नेत्यांनी सवंगपणाची पातळी ओलांडली.  जे नेते कायमच असे बोलतात त्यांची उदाहरणे मी पुन्हा देणार नाहीय पण ज्यांच्याकडून अधिक समंजसपणाची अपेक्षा होती त्या माननीय पंतप्रधान श्री. मनमोहन सिंगांनीही असे बेजबाबदार वक्तव्य करावे म्हणजे कळस झाला.  सतरा पोलिसांचे बळी घेणार्‍या नक्षलवाद्यांवर लष्करी कारवाई करणार नाही.  विकासाची गंगा त्यांच्या दारी न पोचल्याने परिस्थितीमुळेच ते नक्षलवादी झाले आहेत.  असे वक्तव्य करून पंतप्रधानांना नेमके काय सूचित करायचे होते?  ज्यांच्यावर अन्याय झालाय अशा सार्‍यांनीच शस्त्रे हाती घ्यावीत का, म्हणजे सरकार त्यांच्यावर कारवाई न करता चर्चेला तयार होईल?  शिवाय नक्षलवाद्यांशी एकांड्या शिलेदाराप्रमाणे लढणार्‍या पोलिसांच्या मनोधैर्याचे काय?  पुढे जाऊन पंतप्रधान असेही म्हणाले की जर राज्यात पुन्हा कॊंग्रेसचे सरकार आले तर केन्द्राकडून राज्याला भरघोस मदत दिली जाईल.  (वाचा लोकसत्ता दि. १२ ऒक्टोबर २००९ च्या अंकातील मुखपृष्ठावरील बातमी)  म्हणजे मतदारांनी दुसर्‍या पक्षाला मत देऊन सत्तेवर बसविले असते तर केन्द्र सरकार महाराष्ट्राची कोंडी करणार होते असाच अर्थ या विधानातून निघत नाही का?  आचारसंहिता किंवा कायद्याचा मुद्दा बाजुला ठेवला तरी हे राज्यातील जनतेचे ब्लॆकमेलिंग करणारे विधान नैतिकतेच्या कसोटीवर तरी टिकणारे होते काय?

अर्थात १३ ऒक्टोंबर २००९ ला झालेल्या विधानसभा निवडणूकांमध्ये पंतप्रधानांच्या या वक्तव्याने आपली जादु दाखवलीच आणि कॊंग्रेस आघाडी पुन्हा एकदा जोमाने राज्यात सत्तेवर आली.

Thursday, October 14, 2010

चीनी अखबार ने भारतीय सेना का मजाक उड़ाया


नई दिल्ली ( एनबीटी ) : चीन की कम्युनिस्ट पार्टी से सम्बद्ध अखबार ' ग्लोबल टाइम्स ' ने भारतीय सेना पर अप्रिय टिप्पणियां की हैं। एक तरफ तो भारतीय सेना को ' एशिया में सर्वाधिक सक्रिय ' बताकर इशारे से कहा गया है कि भारत के इरादे आक्रामक हैं और दूसरी तरफ इसे बुजदिल बताया गया है क्योंकि भारतीय सैनिकों को ' युद्धबंदी बनने में शर्म नहीं आती। ' हालांकि ' ग्लोबल टाइम्स ' ने 1962 में भारत पर चीन के हमले का सीधा जिक्र नहीं किया है , मगर इशारा बहुत साफ है। गौरतलब है , 1962 में चीन ने भारतीय सैनिकों को युद्धबंदी बना लिया था , जिनमें ब्रिगेडियर रैंक तक के अधिकारी थे।

आम तौर से बुद्धिजीवियों और विद्वानों द्वारा पढ़े जाने वाले अखबार ' ग्लोबल टाइम्स ' ने लिखा कि बेशक भारतीय सेना आज एशिया में सर्वाधिक सक्रिय सेना है , जिसने ताजिकिस्तान में सैनिकों की कथित तैनाती कर रखी है , अफ्रीका में निगरानी स्टेशन कायम किए हैं और बंगाल की खाड़ी में अभ्यास के लिए विमान वाहक भेज रही है। भारतीय सेना लगभग रोज कोई न कोई सैनिक खबर बनाती है , लेकिन बाहरी दुनिया इस बारे में बहुत कम जानती है।

' ग्लोबल टाइम्स ' ने आगे लिखा है कि भारतीय सेना के पास बहुत आधुनिक हथियार हैं , लेकिन उसके सैनिक लड़ने से पहले ईश्वर की प्रार्थना करते हैं। भारतीय सैनिकों की संख्या करीब 13 लाख है , लेकिन शहरों में कोई सैनिक वर्दी में दिखाई नहीं पड़ता। भारतीय सेना का मिलाजुला स्वरूप है लेकिन विभिन्न धर्मों के सैनिक जब मिलते हैं तो एक दूसरे को घूर कर देखते हैं। अगर भारतीय समाज दुनिया में सबसे ज्यादा सुसंस्कृत है तो बेशक भारतीय सेना भी सबसे ज्यादा सुसंस्कृत है।

' ग्लोबल टाइम्स ' ने किन्हीं तीन जवानों से अपनी बातचीत का जिक्र भी किया। ' एक सैनिक ने मुझे बताया कि भर्ती के समय उससे दो कोबरा सांपों को पकड़ने के लिए कहा गया। उसने कारण पूछा तो बताया गया कि बहादुरी की परीक्षा होनी है , जानते हुए भी यह बहुत खतरनाक है , उसने कोबरा पकड़ा। एक अन्य सैनिक ने बताया कि सेना में शामिल होने के लिए उसके पिता को भर्ती अधिकारी के घर पर तीन महीने बेगार करनी पड़ी। तीसरे ने बताया कि अपनी छोटी बहन की इज्जत की कीमत पर वह सेना में भर्ती हो पाया। '

हालांकि खुद चीन की सेना में बड़ी संख्या में बूढ़े - बूढ़े जनरल और मार्शल हैं , फिर भी ' ग्लोबल टाइम्स ' ने लिखा कि भारतीय सेना में बड़ी संख्या बूढ़ों की है , जिनकी दाढ़ी बढ़ी रहती है। सेना में लंबे समय तक रहने के बाद वे महसूस करते हैं कि वे पैसे और अपने परिवार की आजीविका के लिए नौकरी कर रहे हैं। इसलिए वे लस्टम - पस्टम रहते हैं।

किसी भी फौज के लिए जो सबसे ज्यादा अपमानजनक शब्द हो सकते हैं , उनका प्रयोग करते हुए ' ग्लोबल टाइम्स ' ने लिखा कि भारतीय सेना में प्रचलित व्यवहार यह है कि अपने अफसर के आगे तो बहादुरी दिखाओ लेकिन वास्तव में ऐसा करो मत। अगर युद्धबंदी बना लिए जाओ तो उसमें कोई शर्म की बात नहीं। जब तक आपकी जान बचती है और आप सही सलामत घर पहुंच जाते हैं और पैसा मिलता रहता है , तब तक सब ठीक है। जब तक आप जीवित हैं , आप अपने परिवार को चलाने और अच्छी जिंदगी के लिए पैसा बनाते रह सकते हैं। अंत में ' ग्लोबल टाइम्स ' ने टिप्पणी की कि आप भारतीय सेना को जितनी गहराई से देखते हैं उतना ही महसूस करेंगे कि भारतीय सेना भारतीय समाज की तरह जटिल और समझ से परे है।


Friday, October 8, 2010

धर्माच्या नावाचे ब्रॆन्डींग, पण फक्त सोयीचे असेल तिथेच...

जैन धर्म हा जगात आणि भारतात देखील अत्यल्पसंख्य असलेला आणि तरी देखील मोठ्या प्रमाणात आपला प्रभाव टिकवून असलेला ब्रॆंड आहे. होय हा ब्रॆंड आहे असे मी म्हणतोय कारण मी हॊटेलात मेनूकार्ड वर जैन पावभाजी पाहतो. जैन पिझ्झा देखील सर्वांना परिचयाचा असेलच. पण मी कधी बौद्ध, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन आणि हिंदू असे शब्द मागे लावलेल्या नावांचे पदार्थ अजून पाहिलेले नाहीत. त्याचप्रमाणे जैन धर्मीयांमध्ये अनेक व्यक्ती आपले आडनाव जैन असे लावतात. हा प्रकार देखील मी इतर ठिकाणी पाहिलेला नाही म्हणजे मंहमद मुस्लीम, रमेश हिंदू, अशोक बौद्ध किंवा डेव्हीड ख्रिश्चन मी अजून पाहिले नाहीत. पण राजीव जैन, राकेश जैन, महावीर जैन, अशोक जैन असे अनेक जैन बांधव माझ्या परिचयाचे आहेत. त्याचप्रमाणे अनेक मोठ्या उद्योगांना नाव देतेवेळी जैन शब्दाचा प्रकर्षाने वापर केला गेला आहे - जसे की, जैन टीवी, जैन इरिगेशन, इत्यादी. हिंदू ह्या वर्तमानपत्राचा अपवाद वगळता मला जैनेतर कुठल्याही धर्माचा कुठल्या ही उद्योगाकरिता फारसा वापर केल्याचे आढळलेले नाही.

जैनांनी आपल्या धर्माला (म्हणजे फक्त जैन या शब्दाला) अशा प्रकारे आपल्या रोजच्या व्यवहारातील पदार्थांना, स्वत:च्या नावाला, उद्योगाच्या नावाला जोडून त्याचा उच्चार जास्तीत जास्त वेळा कानावर पडेल अशी व्यवस्था करून ठेवलीय. डिसेंबर १९९९ ते फेब्रुवारी २००० दरम्यान मी बिहार मधील एका अतिशय प्रसिद्ध अशा जैन धर्मीयांच्या सामाजिक संस्थेत दोन महिने काम केले होते, त्यावेळी माझ्या पाहण्यात असे आले की तिथल्या जैन साध्वी वेगळ्या प्रकारची पादत्राणे वापरतात (ज्यात प्राण्यांच्या कातडीचा वापर केला गेला नाही). त्याचप्रमाणे त्या काळी वापरात असलेला रोल फिल्मचा कॆमेरा त्यांना चालत नसे. त्यांचे फोटो काढण्यासाठी डीजीटल कॆमेराच वापरला जावा असा त्यांचा आग्रह असे (तेव्हा डीजीटल कॆमेरा अतिशय महाग - साधारणत: रू.५०,०००/- च्या आसपास होता). रोल फिल्म ला प्राण्यांपासून मिळविलेले जिलेटीन लावलेले असते असे त्यांचे म्हणणे होते.

अशा प्रकारे आपल्या धर्मातील तत्वांचे अनुसरण करण्यात हा धर्म अतिशय काटेकोर असल्याचे इतरही अनेक प्रसंगी दिसून येते. उदाहरणार्थ, मांसाहारी व्यक्तिंना आपल्या वसाहतीत जागा न देणे, महावीर जयंतीच्या दिवशी कत्तलखाने बंद ठेवण्याचा आग्रह धरणे, तसेच हा अथवा इतर कोणताही जैन सण व मुस्लिमांची बकरी ईद एकाच दिवशी आल्यास मुस्लिमांना त्यांचा सणात केला जाणारा बकर्‍याच्या आहूतीचा विधी पुढे ढकलण्याची प्रेमळ सक्ती करणे. (खरे तर हे सायकल ने ट्रक ला "मला वाट देण्याकरिता बाजूला हो" असे सांगितल्या सारखे वाटते. गंमत म्हणजे मुस्लिम बांधव ही जैनांची ही सूचना विनातक्रार मान्य करतात.)

आता या सगळ्या गोष्टींमुळे जैन धर्माची तत्त्वे या समाजात अगदी खोलवर रुजली आहेत असा भास होतो. पण यातला फोलपणा जाणवून देणार्‍या काही गोष्टी मला इथे मांडाव्याशा वाटतात.

१. परवाच वीसीडीवर २०१० चा अतियशस्वी चित्रपट राजनीती पाहत होतो. चित्रपट जास्त कंटाळवाणा होता की त्यात ठराविक अंतराने सतत त्रस्त करणार्‍या अल कबीर च्या जाहिराती जास्त कंटाळवाण्या होत्या हे काही मी ठरवू शकलो नाही. या अल कबीर ला इतके वर्ष जाहिरातीची फारशी गरज कधी पडली नव्हती आणि तरी देखील हा आशियातला सर्वात मोठा कत्तलखाना आहे. या कत्तलखान्याच्या भागीदारांपैकी सर्वात मोठा भागीदार हा जैन धर्मीय आहे. (संदर्भ: http://visfot.com/index.php/jan_jeevan/477.html). म्हणजे जैनांच्या नेहमीच्या सवयीनुसार या कत्तलखान्याच्या नावात जैन शब्द असायला हवा होता पण ते गैरसोयीचे असल्याने तसे केले गेलेले नाही.

२. पुण्यातील आकुर्डी येथे एक जैन स्थानक (जैन धर्मीयांचे प्रार्थना स्थळ) आहे. या स्थानकाच्या १०० मीटर परिसरात एक परमीट रूम उघडण्यात आले आहे. धार्मिक स्थळाच्या १०० मीटर परिसरात मद्य विकण्यास कायद्याने परवानगी नाही तरीही असे राजरोसपणे चालु आहे कारण या स्थानकाच्या विश्वस्तांपैकीच एक जण हा त्या परमीट रूमचा देखील भागीदार आहे. यावर कडी म्हणजे या परमीट रूमला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारा स्थानिक नगरसेवक मुस्लिम धर्मीय आहे.

या दोन अतिशय प्रातिनिधिक घटना आहे. अशा अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत आणि अजूनही घडत आहेत. माझा मुख्य आक्षेप असा आहे की, जैन बांधव आपल्या धार्मिक तत्त्वांचे जिथे तिथे गोडवे गात फिरत असतात. इतरांनाही अहिंसा, सदाचार व शाकाहाराचा संदेश देतात (ज्याविषयी माझी काहीच हरकत नाही), पण मग त्यांनी वरील दोन घटनांचा तीव्र विरोध व जाहीर निषेध का केला नाहीय? जैन लोकांचे प्रसारमाध्यमात व समाजाच्या इतर क्षेत्रांमध्येही लक्षणीय प्राबल्य आहे; त्याचा उपयोग करून ते मनात आणले तर आपल्या बांधवांकडून घडणार्‍या अशा गोष्टी निश्चितच थांबवू शकतात.

मला हे ठाऊक आहे की प्रत्येक धर्माच्या लोकांपैकी काही जण अशा प्रकारे चूकीचे आचरण करत असतील पण जेव्हा आपण परधर्मीयांच्या अशा आचरणाचा निषेध करतो तेव्हा प्रथम स्वधर्माच्या लोकांकडून असे काही घडत नाहीयना याची खात्री करून घ्यायला हवी आणि तसे घडत असेल तर प्रथम आपण आपल्या वाट चुकलेल्या बांधवांचा निषेध केला पाहिजे जसा की मी स्वत: एक जैन धर्मीय या नात्याने या ब्लॊगवर करीत आहे.

Thursday, October 7, 2010

धर्मादाय रूग्णालय उभारणार्‍या दानशुराचा काळाकुट्ट इतिहास

बंड वरून आम्ही चालत होतो ते ’पीस’ हॊटेलच्या दिशेनं. जुन्या जमान्यात सर्वाधिक गाजलेलं हे हॊटेल अजून उभं आहे. अजून सुप्रसिद्ध आहे. याचं पूर्वीचं नाव ’कॆथे हॊटेल’. व्हिक्टर ससून या प्रख्यात भारतीय ज्यूनं हे १९३० मध्ये बांधलं.

ससून कुटुंब मूळचं बगदादी ज्यू, पण अनेक पिढ्यांपूर्वी ते भारतात येऊन राहिलं. ब्रिटिशांना अफूच्या व्यापारात मदत करून अपरंपार श्रीमंत झालं. ब्रिटिश राजघराण्यानं व्हिक्टर ससूनला ’सर’ हा किताब दिला होता.

भारतीय स्वातंत्र्ययुद्ध जोरात पेटल्यावर सुरक्षिततेसाठी भारत सोडून तो शांघायला गेला. तिथं त्यानं आपली सारी धनदौलत जमीन-जुमल्यात आणि शर्यतीच्या घोड्यांत ओतली. या शहरात त्याच्या एकूण एकोणीसशे इमारती होत्या. त्यांचा मुकुटमणी ’ससून हाउस’ म्हणजेच त्याचं ’कॆथे होटेल’.

मुंबईला उतरावं तर ’ताज’ मधे, सिंगापूरला ’रॆफेल’ मधे, हॊंगकॊंगला ’पेनिन्सुला’ मधे, तसं शांघायला या ’कॆथे हॊटेल’ मधे असं उच्च वर्तूळात म्हटलं जायचं. त्याचा हिरव्या पिरॆमिडसारखा कळस कुठूनही दिसतो. सर्वात वरच्या बाराव्या मजल्यावर ससूनचं ऒफिस आणि पेंट हाउस होतं. तिथून तो आपल्या जंगी इस्टेटीची देखभाल करी.

हा धनत्तर ससून अतिशय हौशी आणि रंगेल गुलछबू होता. विमान अपघातात दोन्ही पाय निकामी झालेल्या या गृहस्थानं शांघाय गाजवलं. त्याच्या थाटामाटाच्या पार्ट्या, खाने, गाणी-बजावणी, भेटवस्तू, घोड्यांच्या शर्यती आणि लफडीकुलंगडी शांघायमध्ये सर्वांत अधिक चघळली जात. पार्टीला आलेल्या हजारभर पाहुण्यांना भेट म्हणून त्यानं एकदा सोन्याची घड्याळं दिली होती.

दौलतीची ही चढती कमान कम्युनिस्ट राजवट आल्यावर कोसळली. त्यांनी ससूनची सारी जायदाद हिसकावून घेतली. जिथं देशोदेशींचे राजदूत संचार करत असत त्या कॆथेमध्ये हजारो कम्युनिस्ट सैनिक गाडगी-मडकी, सरपण, भाजीपाला, कपड्यांची बोचकी खेचरावर लादून आले. बंदूक हाती दिलेले शेतमजूर ते. असलं वैभव कधी स्वप्नात न पाहिलेलं. त्यांनी घातलेला धुमाकूळ अजब होता. कुणी तास न् तास लिफ्टनं खाली-वर करत. कुणी छपरी पलंगावर उड्या मारत. कुणी संडासच्या कुंडीमध्ये तांदूळ धूत. कुणी आपली खेचरं आतल्या बारला बांधून टाकली. उंची गालिचा लिदीखाली सडला.

सरकारनं हिसकावून घेतलेलं हे हॊटेल १९५३ मधे ससूननं कागदोपत्री सरकारला बहाल केलं. अधिकार्‍यांकडून मोठ्या मिनतवारीनं देशाबाहेर जाण्याचा परवाना मिळवला आणि शांघायमधून पळ काढला. तो म्हणायचा, ’मी भारत सोडला पण चीननं मला सोडलं!’

पुण्याच्या ससून रूग्णालयात मेडिकल कॊलेजची पाच वर्षं काढलेली असल्यानं जुन्या आठवणींचे लोट आले. इतक्या दूरच्या ठिकाणी इतक्या जवळचं नाव असं आकस्मात भेटत होतं, त्याचा आनंद झाला. पण ज्या ससून कुटुंबानं दक्षिण महाराष्ट्रातल्या लाखो रूग्णांची सोय केली, त्याची दया दुसर्‍या एका देशाला व्यसनाच्या खाईत लोटून कमावलेल्या पैशावर बेतलेली होती, हे उमगून मन विषण्ण झालं. ’ठेव म्हणून ठेवलेल्या जमिनी विश्वस्तांनीच लाटून, त्यांच्यावर इंग्लिश बॆरिस्टरांच्या जगाला कायदा शिकवणार्‍या ’इन्स ऒफ द कोर्ट’ या संस्था पूर्ण बेकायदेशीरपणे उभारल्या’ हे सत्य समजल्यावर झालं होतं तसं.

पुढे अनेक वर्षांनी ’पीस हॊटेल’ या नावानं ससूनच्या कॆथे हॊटेलचं पुनरूज्जीवन झालं. पूर्वीसारखं सजवून ते पर्यटकांसाठी उघडलं गेलं. तिथं जाऊन कमीतकमी चहा तरी पिऊन यावं असा माझा मनोदय होता.

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हॊटेल पसरलेलं. उजव्या हाताच्या इमारतीत मुख्य प्रवेशद्वार होतं. गेल्या शतकाच्या प्रारंभीच्या ’निओ-क्लासिकल’ शैलीतली सहा मजली देखणी इमारत. तिच्या दुधी आणि शेवाळी रंगसंगतींवर सोनेरी वेलबुट्टी झळकत होती. त्याच रंगांच्या गणवेषातल्या दरवानानं आदबीनं वाकून स्वागत केलं आणि आत पाचारण केलं.

आतली सजावट तशीच भारदस्त. किंचित अंधार्‍या स्वागत-कक्षात भरगच्च झुंबरं, जाड गालिचे, चमकतं जॊर्जिअन फर्निचर आणि जाड मखमली पडदे होते. हॊंगकॊंगमधल्या चायना-क्लबसारखं पुन्हा एखाद्या इंग्लिश-क्लबमधे शिरल्यासारखं वाटलं.

सुंदर कोरीव जिना. वरच्या मजल्यावर चहापानाची व्यवस्था होती. तिथं जाऊन जुन्या आरामखुर्च्यांमधे सैलावून बसलो. संत्र्याचा रस आणि इथली ’खासियत’ म्हणून सेवकानंच सुचवलेला क्लब सॆंडविच मागवला आणि सभोवती पाहायला लागलो.

नोएल कॊवर्ड गळपट्टा सावरीत आता तिकडून येईलसं वाटलं. येईल सुद्धा! ’प्रायव्हेट लाईफ’ हे त्याचं गाजलेलं नाटक इथंच लिहिलं गेलं होतं. आतल्या खोलीत, लेखकांच्या गराड्यात सॊमरसेत मॊम ’रेझर्स एज’ वाचून दाखवत असेल, की ग्रॆऎम ग्रीनचे खास मित्र त्याला नव्या रहस्यकथेचा प्लॊट सांगायचा आग्रह करत असतील?

पूर्वी सजावट, भोजन आणि मदनमस्त खेळ यांनी वेगळं वलय बहाल केलेलं हे आगळंवेगळं हॊटेल आज जुनाट, मंद आणि किंचित केविलवाणंच वाटत होतं. कर्जबाजारी वतनदारानं आपला पुरातन वाडा कसाबसा तगवून धरल्यासारखं. लठ्ठ चिरूट ओढणारे दोन अमेरिकन, त्यांच्या जाडजूड बायका आणि घसा खरवडत बोलणारे जर्मन. आम्ही वगळता कुतूहलानं जमलेली एवढीच पर्यटक मंडळी आता इथं हजर होती.

मागवलेला खास पदार्थही काही खास नव्हता. तेव्हा दोन ऒरेंज ज्यूसचे ३५० रूपये टिच्चून ’एवढ्या पैशात मुंबईला उडप्याकडे चार जण जेवलो असतो’ असं हळहळत बाहेर आलो. त्या भिकार क्लब-सॆंडविचचे पैसे देण्याचं मात्र आम्ही नाकारलं.

चीनी माती (लेखिका - मीना प्रभू)

Wednesday, September 22, 2010

चतुर गुन्हेगाराने नामवंत महिला पोलीस अधिकार्‍याला चकविले.

बिकीनी किलर या नावाने कुप्रसिद्ध असणारा चार्ल्स शोभराज गुन्हेगारी पेक्षाही जास्त स्मरणात राहिला तो त्याच्या प्रभावी व्यक्तिमत्वामुळेच. साधारण पंचवीस वर्षांपूर्वी चार्ल्स दिल्लीच्या तिहार तुरुंगात होता तेव्हा त्याच्या संभाषण कौशल्याने साक्षात किरण बेदी देखील अतिशय प्रभावित झाल्या. त्यांनी त्याला त्याच्या ज्ञानाचा (?) प्रसार करण्यासाठी इलेक्ट्रॊनिक टाईपरायटरसह इतर अनेक अद्ययावत सुविधा तुरूंगात पुरविण्याची व्यवस्था केली. तरी बरं त्याकाळी संगणक किंवा इंटरनेट नव्हता नाहीतर या गोष्टीदेखील त्याला सहज मिळाल्या असत्या. प्रत्यक्षात काहीही लिखाण वगैरे न करता या महाभागाने तुरूंगातील आपलं वास्तव्य फक्त आरामदायी करून घेतलं. आपल्याला चार्ल्सने बनविले हे किरण बेदींच्या फारच उशिरा लक्षात आले.

Tuesday, September 21, 2010

काव्या विश्वनाथनची वाङ्मयचोरीची कबुली

काव्या विश्वनाथन या किशोरवयीन भारतीय वंशाच्या लेखिकेने आपण वाङ्मयचोरी केल्याचे कबूल केले आहे. तिच्या 'हाऊ ओपल मेहता गॉट किस' आणि 'गॉट वाइल्ड अँड गॉट अ लाइफ' या पुस्तकाचे हक्क अमेरिकन प्रकाशन कंपनी लिटल ब्राऊनने पाच लाख डॉलरना खरेदी केल्यानंतर अनेक वृत्तपत्रांनी तिच्यावर स्तुतीसुमने उधळली होती.

परंतु तिच्या या पुस्तकांचे मेगॅन एफ मॅककॅर्फ्टी यांच्या 'स्लोपी र्फस्ट्स' आणि 'सेकंड हेल्पिंग' या दोन्ही पुस्तकांशी सार्धम्य असल्याचे उघडकीस आल्याने काव्याने आपली वाङ्मयचोरी कबूल केली. परंतु, ते योगायोगाने घडून आले, शाळेत असताना ही पुस्तके वाचल्याने लिहिताना त्यातील भाग अनवधानाने आला, अशी पुस्तीही तिने जोडली.

ही वर्ष २००६ ची घटना आहे.

दैनिक लोकसत्तामधली बातमी इथे वाचा (प्रथम फॊन्ट लोड करून घ्या):-
http://www.loksatta.com/old/daily/20060427/mp05.htm

चोरी है काम मेरा

भारतीय सिनेमा में कुछ ऐसी फिल्में हैं, जिनके लिए कहा जाता है कि उन्होंने हिंदी सिनेमा का इतिहास बदल दिया, पर वास्तविकता कुछ और है. दरअसल इसके लिए निर्देशक-लेखक को बधाई नहीं दी जानी चाहिए. शक्ति सामंत की फिल्म आराधना के गीतों ने न जाने कितने युवाओं के मन में अपने सपनों की रानी की कल्पना को शक्ल दे दी थी. उस दौर के युवकों ने न जाने कितनी हसीनाओं को रूप तेरा मस्ताना गीत सुनाकर दिल दिया होगा. इस फिल्म ने उस दौर के आशिकों के दिल में इश्क़ की आग लगा दी थी, लेकिन यह फिल्म शक्ति दा का ओरिजनल कांसेप्ट न होकर हॉलीवुड की टू इच हीज ऑन की नक़ल मात्र थी. इसी तरह ऋषिकेश मुखर्जी द्वारा निर्देशित फिल्म अभिमान ने जया बच्चन को फिल्मफेयर बेस्ट एक्ट्रेस का पुरस्कार दिलवाया था. यह फिल्म ए स्टार इज बॉर्न की नक़ल थी. 90 के दशक में महेश भट्ट की सुपरहिट फिल्म साथी से पाकिस्तानी क्रिकेटर मोहसिन खान एवं आदित्य पंचोली स्टार बन गए थे. जबकि साथी को मिलने वाली सफलता और अवार्ड के सही हक़दार स्कारफेस के लेखक थे, क्योंकि यह सुपरहिट फिल्म भी एक नक़ल थी.

नरेंद्र बेदी की खोटे सिक्के एवं फिरोज़ खान की धर्मात्मा से लेकर रामू की सरकार जैसी फिल्मों को हिंदी सिनेमा में क्रांतिकारी बदलाव लाने के लिए याद किया जाता है, लेकिन यह सारे बदलाव दूसरे मुल्क़ों की कहानियों को चुराकर किए गए. 1980 में ऋृ षि कपूर स्टारर फिल्म क़र्ज़ ने सुभाष घई को शीर्ष निर्देशकों की कतार में लाकर खड़ा कर दिया, लेकिन तब शायद ही कोई जानता होगा कि यह फिल्म 1960 में आई हॉलीवुड फिल्म द रिइंकारनेशन ऑफ पीटर प्राउड की नक़ल थी. रवि चोपड़ा द्वारा निर्देशित फिल्म द बर्निंग ट्रेन वर्ष 1975 में आई जापानी फिल्म द शिंकनसेन दैबाकुहा की नक़ल थी. अशोक कुमार की हास्य पटकथा वाली बासु चटर्जी द्वारा निर्देशित फिल्म शौक़ीन हॉलीवुड की फिल्म द ब्वॉयज नाइट आउट की नक़ल थी. राकेश रोशन द्वारा निर्देशित फिल्म खून भरी मांग, जिसे तीन फिल्म फेयर अवार्ड मिले, वह भी ऑस्ट्रेलियन लघु फिल्म रिटर्न टू एडेन से प्रेरित थी. मुकुल आनंद द्वारा निर्देशित फिल्म अग्निपथ को दो फिल्मफेयर अवार्ड मिले और बेस्ट एक्टिंग के लिए अमिताभ बच्चन को नेशनल फिल्म अवार्ड मिला, जिसके हक़दार वे लोग कतई नहीं थे. निर्देशक संजय ग़ढवी के मुताबिक़ अमेरिका में अच्छे लेखक हैं, जबकि यहां अच्छे लेखकों की कमी है, इसलिए प्रेरणा लेने में कोई बुराई नहीं है. ग़ौरतलब है कि उनकी फिल्म मेरे यार की शादी है, जूलिया रॉबटर्‌‌स की सुपरहिट फिल्म माई बेस्ट फ्रेंड्‌स वेडिंग की नक़ल थी. बॉलीवुड में कलाकारों के कॉस्ट्यूम और नाच-गाने पर ज़्यादा ध्यान दिया जाता है, जबकि हॉलीवुड में फिल्म की स्क्रिप्ट और प्रोडक्शन हाउस ज़्यादा मायने रखते हैं. बॉलीवुड में वेस्टर्न फिल्मों की नक़ल का स़िर्फ नए लोग ही नहीं करते बल्कि इस मामले में इंटेलिजेंट इडियट आमिर खान भी पीछे नहीं है. उनकी सुपरहिट फिल्म गजनी बॉलीवुड की पहली ऐसी फिल्म थी, जिसने बॉक्स ऑफिस पर एक बिलियन रुपये से अधिक का कारोबार किया. यह फिल्म साउथ की सूर्या स्टारर गजनी की रीमेक थी और साउथ वाली गजनी हॉलीवुड फिल्म मोमेंटो की नक़ल थी. मतलब वही चोरी का क़िस्सा. ग़ौरतलब है कि मोमेंटो को वर्ष 2002 में बेस्ट स्क्रीनप्ले के लिए नामांकित किया गया था. बॉलीवुड की नक़ल करने की इस आदत पर वर्ष 2006 में फोर स्टेप प्लान नामक एक डॉक्यूमेंट्री भी बनी.

वर्ष 1940 में आई महबूब खान की फिल्म औरत को सत्रह साल बाद मदर इंडिया के नाम से दोबारा बनाया गया, वह भी वर्ष 1937 में आई हॉलीवुड फिल्म द गुड अर्थ से प्रेरित थी. बॉलीवुड की ऑल टाइम सुपरहिट फिल्म शोले का निर्माण सात हॉलीवुड फिल्मों की प्रेरणा से हुआ था. उनमें वंस अपॉन ए टाइम इन द वेस्ट (1968), स्पैगिटी वेस्टर्न, द वाइल्ड बंच (1969), पैट गैरेट एंड बिली द किड (1973) और बच कैसिडी एंड द संडेंस किड (1969) आदि प्रमुख हैं. अमिताभ बच्चन की पा 1996 में आई हॉलीवुड फिल्म जैक की नक़ल है. अक्षय कुमार की आने वाली फिल्म एक्शन रिप्ले ब्रैड पिट की सुपरहिट फिल्म द क्यूरियस केस ऑफ बेंजामिन बटन से प्रेरित बताई जा रही है. हासिल फेम निर्देशक तिग्मांशु धूलिया कहते हैं कि उनकी ओरिजनल कहानी पर आधारित फिल्म को कोई भी प्रोड्यूसर फाइनेंस नहीं करना चाहता. तिग्मांशु को अपनी फिल्म के निर्माण के लिए अपने दोस्तों पर निर्भर रहना पड़ा था. इस इंडस्ट्री में स़िर्फ निर्देशकों और कहानीकारों को ही हॉलीवुड की नक़ल करने का भूत नहीं सवार है, बल्कि निर्माता भी किसी फिल्म में पैसा लगाने से पहले यह निश्चित कर लेते हैं कि अमुक फिल्म हॉलीवुड की किसी फिल्म की नक़ल है या नहीं. ऐसी सैकड़ों फिल्में हैं, जिन्हें हॉलीवुड की फिल्मों से नक़ल करके तैयार किया गया है. इन फिल्मों के हिट हो जाने के बाद निर्देशक, निर्माता और कलाकार पुरस्कार लेने के लिए कतार में खड़े नज़र आते हैं. इनमें से कइयों को अवार्ड मिल भी जाते हैं. पुरस्कार क्या, पद्मश्री तक मिल जाती है. अवार्ड देने से पहले और बाद में ज्यूरी मेंबर यह सोचने की ज़हमत तक नहीं उठाते कि क्या सचमुच यह लोग इन पुरस्कारों के हक़दार हैं भी या नहीं.

उधर का माल इधर

अभिमान 1973- ए स्टार इज बॉर्न 1954

धर्मात्मा 1975- द गॉड फादर 1972

रफूचक्कर 1975- सम लाइक इट हॉट 1959

क़र्ज़ 1980- द रिइंकारनेशन ऑफ पीटर प्राउड 1960

द बर्निंग ट्रेन 1980- द शिंकनसेन दैबाकुहा 1975

शौक़ीन 1981- द ब्वॉयज नाइट आउट 1962

जांबाज़ 1981- डुअल इन द सन 1946

सत्ते पे सत्ता 1982- सेवन ब्राइड्‌स फॉर सेवन ब्रदर्स 1954

खून भरी मांग 1988- रिटर्न टू एडेन 1983

तेज़ाब 1988- स्ट्रीट्‌स ऑफ फायर 1984

साथी 1990- स्कारफेस 1983

दिल है कि मानता नहीं 1991- इट हैपंड वन नाइट 1934

जो जीता वही सिकंदर 1992- बे्रकिंग अवे 1979

चमत्कार 1992- ब्लैक बियडर्‌‌स गोस्ट 1968

बाज़ीगर 1993- ए किस बिफोर डाइंग 1991

खलनायिका 1993- द हैंड दैट रॉक्स द क्रौडल 1992

मैं खिलाड़ी तू अनाड़ी 1994- द हार्ड वे 1991

अकेले हम अकेले तुम 1995- क्रैमर वर्सेस क्रैमर 1979

याराना 1995 - स्लीपिंग विथ एनेमी 1991

पापी गुड़िया 1996- चाइल्ड्‌र्स प्ले 1988

चोर मचाए शोर 1997- ब्लू स्ट्रीक

गुलाम 1998- ऑन द वाटर फ्रंट 1954

दुश्मन 1998- आई फॉर एन आई 1996

मोहब्बतें 2000- डेड पोएट्‌स सोसाइटी 1989

क़सूर 2001- जैग्ड ऐज 1985

कांटे 2002- रिजर्वायर डॉग्स 1992

राज़ 2002- वाट लायज बिनिथ 2000

धूम 2003- द फास्ट एंड द फ्यूरियस 2001 एवं ओसियंस एलेवन 2001

जिस्म 2003- बॉडी हीट 1981

कोई मिल गया 2003- ई. टी. द एक्सट्रा टेरेसट्रियल 1982

हम तुम 2004- वेन हैरी मेट सैली 1989

मुन्ना भाई एमबीबीएस 2003- पैच एडम्स 1998

मर्डर 2004- अनफेथफुल 2002

सलाम नमस्ते 2005- नाइन मंथ्स 1995

ब्लैक 2005- द मिराकल वर्कर 1962

बंटी और बबली 2005- बोनी एंड क्लायड 1967

सरकार 2005- द गॉड फादर 1972

रंग दे बसंती 2006- ऑल माई संस 1948 एवं जीसस ऑफ मांट्रील 1989

कृष 2006- पे चेक 2003

चक दे इंडिया 2007- मिराकल 2004

भेजा फ्राई 2007- डिनर डे कॉन्स 1998

लाइफ इन ए मेट्रो 2007- द अपार्टमेंट 1960

हे बेबी 2007- थ्री मेन एंड अ बेबी 1987

वेलकम 2007- मिक्की ब्लू आइज 1999

सिंह इज किंग 2008- मिराकल्स 1989

दोस्ताना 2008- नाउ प्रोनाउंस यू चक एंड लैरी 2007

युवराज 2008- रेन मैन 1988


गीत चोरी का आरोप कितना सच

प्रख्यात गायक भूपेन हजारिका द्वारा गाई गई रचना- गंगा तुम बहती हो क्यों, उनकी मौलिक कृति नहीं है. उन्होंने संगीत रचना एवं गीत की भावनाएं अमेरिकी कलाकार की एक मशहूर रचना से कॉपी की थी. यह रहस्योघाट्‌न अमेरिका में रह रहे एक भारतीय मुकेश थामस ने पिछले दिनों दोनों संगीत प्रस्तुतियों के गहन अध्ययन के बाद किया है.

वर्ष 1927 में अमेरिका के संगीतकार जूलियस ब्लेडसो की एक संगीत रचना ओल्ड मेन रिवर ऑफ शो वोट संगीत के इतिहास की एक अमर कृति है. इस कृति के जनक को इस संगीत रचना के लिए अमेरिका ही नहीं, समूचे यूरोप में हमेशा से स्मरण किया जाता रहा है. आज से डेढ़ दशक पूर्व इंटरनेट की सुविधा न होने की वजह से अंतरराष्ट्रीय गतिविधियों पर शोध कर पाना भारत में संभव नहीं था. भूपेंन हजारिका ने अपनी रचना-विस्तार है आपार, की प्रस्तुति के दौरान कभी भी किसी भी मंच पर यह घोषणा नहीं की कि गंगा उनकी मौलिक रचना नहीं है.


उन्होंने कभी भी अमेरिका के प्रख्यात संगीतकार जूलियस ब्लेडसो का नाम नहीं लिया. पूरे भारत में, गंगा तुम बहती हो क्यों रचना भूपेन हजारिका द्वारा लिपिवद्ध, संगीतवद्ध और गाई गई रचना के रूप में जानी जाती है. जूलियस के इस चर्चित गीत को अमेरिका के कई कलाकारों ने विभिन्न मंचों पर गाया है. इसके अलावा कई टीवी कार्यक्रमों में भी यह गीत उपयोग किया गया है. पालाबिंसन ने 1928, 1932 एवं 1936 में इस गीत को फिल्म में चित्रित किया है. बिंग क्रासवी, फ्रैड सिनड्रा, सैम कुक, अल जानसन, रेचार्ल्स, जिम क्रोस, जिमी रिक्स ने इसे अमेरिकी शास्त्रीय संगीत के प्रमुख गीत के रूप में स्वीकार किया था. मेल्विन फैडलिन ने तो इस गीत को कई महफिलों में गाया था. जुड़ी गारलैंड ने भी इस गीत को अपना स्वर दिया था.

मुकेश थामस के अनुसार, भूपेन हजारिका ने अपनी पीएचडी की डिग्री कोलंबिया यूनिवर्सिटी से पूरी की थी. इस अध्ययन के दौरान वे पाल रॉबिंसन जैसे गायक के सहयोगी भी रहे थे. इस दौर में भूपेन हजारिका ने जो गीत सीखे उनका प्रदर्शन उन्होंने अपने शेष जीवन की संगीत रचनाओं में भारत में रहकर किया था. भूपेन हजारिका द्वारा गाई गई रचना- गंगा तुम बहती हो क्यों, भारत के संगीत जगत में एक नया अध्याय जोड़ने वाली कृति के रूप में याद की जाती है. स्वरों के उतार चढ़ाव और भाषा की मौलिकता इस गीत की खूबी है. मूल रूप से गाई गई जूलियस ब्लेडसे की रचना भी मिसीसिपी नदी पर आधारित है. इस गीत के भाव को महसूस करने के बाद भूपेन की रचना चोरी की गई प्रतीत होती है.

मुकेश थामस इन दिनों अमेरिका में रह कर भारतीय संगीत पर यूरोपीय प्रभाव का व्यापक अध्ययन कर रहे हैं. उनका दावा है कि भूपेन हजारिका के बारे में इस तरह के खुलासे से भारतीय संगीत प्रेमियों को आघात लग सकता है, लेकिन यही सच्चाई है.

हुशार विद्यार्थी (?)

वर्तमानपत्रात कुठल्याही विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल काही छापून आलं की माझी आई ते मला मुद्दाम वाचून दाखविते मग त्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा, त्या विद्यार्थ्यांना काहीच साधन उपलब्धता नसताना त्यांनी मिळविलेलं अपार यश आणि त्या तूलनेत माझ्याकडे सारं काही असताना मी कसा अपयशी वगैरे गुर्‍हाळ दोन चार दिवस तरी आमच्या घरी चालतंच.

एकदा असंच पेपरात नाव आलं कचरू वाघ या विद्यार्थ्याचं. या गरीब विद्यार्थ्याने दिवसभर कष्टाची कामे करून, रात्रशाळेत अभ्यास करून बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविलं होतं. झालं.. कचरूच्या नावाचा जप आमच्या घरी चालु झाला. अर्थात ह्यावेळी जप दोन दिवसातच थांबला कारण वर्तमानपत्राच्या पुढच्याच अंकात बातमी आली ती अशी की कचरूने स्वत: पेपर लिहीलेच नव्हते तर स्वत:ऐवजी पूर्णवेळ शिक्षण घेतलेल्या एका हुशार अल्पवयीन विद्यार्थ्याकडून ते लिहून घेतले होते.

पुढे काही काळानंतर अशीच एका पुण्यातल्या विद्यार्थिनीची (तिचं नाव आता आठवत नाही) बातमी आली - ती सीए ची परीक्षा पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याची. तिचे लगेच सत्कार वगैरे ही झाले पण दोन दिवसानंतर उघड झालं की ती प्रत्यक्षात अनुत्तीर्ण झाली होती तरी तिने खोटे निकालपत्र वगैरे गोष्टी अगदी व्यवस्थित पैदा केल्या व सर्वांना दोन दिवस चकविले.

या सर्वांवर कडी म्हणजे विद्या प्रकाश काळे ही युवती. ही प्रत्यक्षात खरोखरच अतिशय हुशार आहे. आता ही साधारण पस्तीशीची असेल पण वयाच्या जेमतेम अठराव्या वर्षापासून ती चोर्‍या करण्यात पटाईत आहे. वेळोवेळी तुरूंगात ही गेली आहे तर अनेकदा पोलिसांना तिने गुंगारा ही दिला आहे. आता तिने स्वत:ची मोठी टोळीही स्थापन केली आहे. तुरूंगातील वास्तव्यात तिने आपल्या हुशारीच्या जोरावर कायद्याचे शिक्षणही पूर्ण केले आहे. अर्थात वकील झाल्यावर ती पुढे अनेकदा पोलिसांकडून पकडली गेली असली तरी तिला फारशी कडक शिक्षा होऊ शकली नाही याचे सारे श्रेय तिच्या वकिली कौशल्याला जाते.

तिच्या विषयीची एक बातमी तुम्ही इथे वाचू शकता :-

http://72.78.249.126/esakal/20100522/5736895754452919648.htm

इतर अनेक चोर्‍यांप्रमाणे हिने वय देखील चोरलेले दिसतंय.. बातम्यांमध्ये वय कमी दाखवलंय..

http://www.punenews.net/2010/05/lawyer-woman-run-gang-arrested-for.html

http://www.expressindia.com/latest-news/woman-among-five-arrested-for-robbery-plot/621283/

http://news.in.msn.com/crimefile/article.aspx?cp-documentid=3924613&page=10

http://news.indiainfo.com/c-83-144953-1263496.html

विद्याचा सुरूवातीच्या काळातील पराक्रम (मोटरसायकलकरिता लहान मुलीचे अपहरण):-

http://www.indianexpress.com/ie/daily/19971213/34750503.html

खरं कारण काय?

नोकरीनिमित्ताने केलेल्या माझ्या बेळगावच्या वास्तव्यादरम्यान माझा सिमेन्स, मुंबईच्या एका अधिकार्‍याशी परिचय झाला. हे गृहस्थ (ह्यांच्या नावाची इनिशिअल्स एसबी. पुढे ह्यांचा असाच उल्लेख केला जाईल) मोठे रसिक आणि कलासक्त (आणि मुख्य म्हणजे देव आनंद चे ग्रेट फॆन) त्यामुळे आमच्या गप्पा मस्त रंगायच्या. कलाक्षेत्रातल्या अनेक मंडळींना ते जवळून ओळखतात हे मला त्यांच्याशी बोलताना समजले. त्याचे कारण विचारताच त्यांनी सांगितले ती अमूक एक गायिका - ती ह्यांची आत्या (इथे नाव लिहीत नाही पण पुढे जे वर्णन येईल त्यावरून चाणाक्ष वाचक ओळखतीलच म्हणा..).

आता एसबी साहेबांचा स्वभाव एकदम मनमोकळा त्यामुळे माझ्या मनात अनेक वर्षांपासून खदखदत असलेला प्रश्न त्यांना विचारावा असे मला वाटले. आणि अगदी सहजच बोलल्यासारखा मी त्यांना म्हणालो, "एसबी साहेब, तुमच्या आत्याचा आवाज अगदी हुबेहूब लता मंगेशकरांसारखा आहे, पण लताजींच्या तूलनेत त्यांनी फारच थोडी गाणी गायलीत. गेली अनेक वर्षे मी असं ऐकत / वाचत आलोय की लताजींनी राजकारण करून तुमच्या आत्याबाईंना पुढे येऊ दिलं नाही. याशिवाय काही काळापूर्वी वर्तमानपत्रात तुमच्या आत्याबाईंची मुलाखत वाचली तेव्हा त्यांनी या गोष्टीचा साफ इन्कार केलाय. त्या म्हणतात ’माझ्या व्यावसायिक पिछाडी बद्दल दुसर्‍या कुणाला जबाबदार धरले जाऊ नये. मी मागे पडले कारण माझे लग्न झाले, संसार चालु झाला. ज्याप्रमाणे एखादी नोकरी करणारी स्त्री लग्नानंतर प्रापंचिक जबाबदार्‍यांमुळे नोकरी सोडते तितक्याच सहजतेने मी गाणे सोडले’. मग आता तुम्हीच सांगा खरं कारण काय? तुमच्या आत्याबाईंची कारकीर्द नेमकी कशामुळे संपुष्टात आली?"

एसबी साहेब उत्तरले, "त्याचं असं आहे चेतन, ही दोन्ही कारणं तितकीच खोटी आहेत. खरी गोष्ट अशी की आमच्या आत्याचे नाव त्याकाळच्या एका नामांकित हिन्दी-मराठी चित्रपटांच्या संगीतकाराबरोबर (यांचंही नाव इथे मी लिहू शकणार नाही पण वाचक अंदाज लावू शकतात) जोडले जाऊ लागले होते व त्यात काही प्रमाणात तथ्यदेखील होते याची प्रचीती आल्यावर आत्याच्या यजमानांनी आमच्या आत्याचं गाणं बंद करायला लावलं. आता आमची आत्या मुलाखतीत तिची व्यावसायिक कारकीर्द संपुष्टात येण्याच हे खरं कारण कुठल्या तोंडानं सांगणार?"

आता एक उलट उदाहरण (म्हणजे काळ्या प्रकरणाची रूपेरी बाजू)

२००४ सालच्या विधानसभा निवडणूकीनंतर लोकसत्ता ने त्यांच्या वाचकांसाठी एक स्पर्धा घोषित केली सरकारकडून माझ्या अपेक्षा या विषयावर लेख लिहायचा. निवडक लेखकांना थेट मुख्यमंत्र्यांशी एक तास चर्चा करायची संधी असले भन्नाट बक्षीस होते. माझा लेख ही निवडला गेला आणि जानेवारी २००५ मध्ये वर्षा बंगल्यावर श्री. विलासराव देशमुखांच्या माझ्या सह इतर आठ पत्र लेखकांनी भेट घेतली. चर्चेच्या दरम्यान देशमुख साहेब अगदी रंगात येऊन एक किस्सा सांगू लागले.

ते म्हणाले, "तुम्हाला वाटतं पण बरेचदा आम्हा राजकारणी लोकांना देखील नोकरशाहीचा भोंगळ कारभार दिसतो पण त्याविरुद्ध काही करता येत नाही. मागे एकदा मी शिक्षणमंत्री असताना माझ्या हस्ते ४ थी च्या विद्यार्थ्यांना पुस्तक वाटपाचा कार्यक्रम झाला. पुस्तक मिळाल्याची पोच म्हणून त्या कार्यक्रमात चक्क विद्यार्थ्यांचा अंगठा उमटवला जात होता. चौथीच्या विद्यार्थ्याचा अंगठा का घ्यावा का लागतो? त्याला सही करता येत नाही का? आणि तसे असेल तर मग तो विद्यार्थी वाचणार तरी काय? तर हे सगळे असे असून ही मी संबंधित अधिकार्‍याला जाब विचारू शकलो नाही कारण मलाही मर्यादा होत्या आणि आहेत."

एवढे बोलून देशमुखसाहेब थांबले. सर्व पत्र लेखक थक्क झाले होते. स्वत: मुख्यमंत्री च प्रशासनाविरुद्ध बोलत होते ही अतिशय catchy बाब होती.

त्यावेळी मी मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन त्यांना याच प्रकरणाची दुसरी बाजू ऐकविली ती अशी:-

मी म्हणालो, "सर, आपण जसे पुस्तक वाटप केले होते अशाच एका कपडे / अन्न वाटप कार्यक्रमात बिहार येथे मी एक निरीक्षक या नात्याने एका सेवाभावी सामाजिक संस्थेतर्फे काम पाहिले होते. या कार्यक्रमात देखील ज्यांना वस्तूचे वाटप करण्यात आले अशांपैकी अनेक लहान मुले व स्त्रिया यांना लिहीता वाचता येत असूनही आम्ही त्यांना स्वाक्षरी करू दिली नाही व त्यांच्या अंगठ्याचे ठसे च नोंदीकरता घेण्यात आले कारण या नव्याने अक्षर ओळख झालेल्यांना स्वाक्षरी करायला दोन ते तीन मिनीटे लागतात आणि वाटप ज्यांच्या हस्ते व्हायचेय अशा व्यक्ती आपल्या सारख्याच मोठ्या पदावरील असल्याने त्यांना फारसा वेळ नसतो. अंगठा लावण्याचे काम काही सेकंदात होते म्हणून ते जास्त व्यवहार्य ठरते. तेव्हा याचा अर्थ असा नव्हे की ज्या विद्यार्थ्यांना आपण पुस्तके वाटली ती निरक्षर होती. तरी कृपया आपण संबंधित अधिकार्‍यांविषयी कुठलाही आकस मनात बाळगू नये व त्यांची अडचण समजून घ्यावी ही विनंती."


माझ्या या उत्तराने सारेच चकित झाले व मुख्यमंत्र्यांनीही आपल्याला ही माहिती नवीन व मोलाची वाटली असल्याचे कबूल केले त्याचप्रमाणे ते वस्तुस्थितीशी सहमत झाले..

डोळ्यात येते पाणी

१९६२ साली आपण चीन सोबत चे युद्ध हारलो तरी आपले जे जवान सीमेवर लढले त्यांचे मनोधैर्य उंचावण्याकरिता आणि जे रणांगणात शहीद झाले त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरिता सरकारी पातळीवर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्या समारंभाला साजेसे एक गीत बसविण्याची जबाबदारी संगीतकार सी. रामचंद्र यांच्यावर देण्यात आली. हे गीत लता मंगेशकर गाणार हे निश्चित झाले तरी ते लिहीणार कोण हा प्रश्न होताच. तेव्हा सर्व नामवंत गीतकार चित्रपटासाठी गीत लिहीण्यात व्यग्र होते अचानक सी. रामचंद्र यांच्यासमोर कवी प्रदीप यांचे नाव आले. कवी प्रदीप यांच्या तत्वज्ञानानी भारलेल्या गीतांना व्यावसायिक चित्रपटात फारशी मागणी नव्हती त्यामुळे सी. रामचंद्रांनी त्यांचेकडून बरेच दिवसात कुठलेही गीत लिहून घेतले नव्हते. जेव्हा या सरकारी कार्यक्रमाकरिता गीताची मागणी रामचंद्रांनी प्रदीप यांचेकडे केली तेव्हा कवी प्रदीप उसळून म्हणाले, "मानधन मिळायचे असेल तेव्हा तुम्हाला माझी आठवण येत नाही आणि अशा फुकटछाप सरकारी कार्यक्रमाकरिता मी गीत लिहून द्यावे असा तुमचा आग्रह का? मी हे काम मुळीच स्वीकारणार नाही."

मोठ्या कष्टाने सी. रामचंद्र यांनी कवी प्रदीप यांची समजूत काढण्यात यश मिळविले आणि सरतेशेवटी त्यांच्याकडून एक लांबलचक गीत लिहून घेतलेच. ऐ मेरे वतन के लोगो, जरा आंखमे भरलो पानी या गीताची ही सून्न करणारी बाजू काही वर्षांपूर्वी लोकसत्तात वाचली आणि एका वेगळ्याच अर्थाने डोळे भरून आले.

एका चित्रपटाच्या निर्मितीखर्चात दोन चित्रपट

अशोक कुमार यांनी चित्रपटनिर्मिती करायला घेतली तेव्हा त्यांनी आपल्याच राज्यातील एका प्रतिभासंपन्न दिग्दर्शकाला संधी दिली. त्या दिग्दर्शकानेही या संधीचे सोने केले आणि सुंदर चित्रपट बनविला परिणीता पण त्याबरोबरच अशोककुमार यांनी चित्रपटनिर्मितीकरिता दिलेल्या आर्थिक स्वातंत्र्याचा गैरफायदा घेत स्वत:च्या आवडीचा अजून एक चित्रपट अशोककुमार यांच्या पैशातूनच बनविला जो प्रचंड गाजला. त्यांनी खोटे हिशेब दाखवून परिणीताच्या निर्मितीखर्चात गाळा मारून अशोक कुमार यांची फसवणूक करून हे कृत्य केले होते. दिग्दर्शक बिमल रॊय यांच्या दो बिघा जमीन या चित्रपटाची ही चक्रावून टाकणारी निर्मिती कथा अशोक कुमार यांनी त्यांच्या जीवननैया या आत्मचरित्रात्मक पुस्तकात नमूद केली आहे.