रतन टाटा यांना भारतरत्न दिले पाहिजे का? हा प्रश्न सध्या समाज माध्यमांमध्ये फार जोमाने चर्चेत आहे.
पण ते आधीपासूनच भारतरत्न आहेत. खोटं वाटतंय? थांबा सिद्धच करुन दाखवतो.
वर दिलेल्या लिंकवर जा. तिथे तुम्हाला मिळकत कर थकबाकीदार यादी असा एक पर्याय दिसेल.
या पर्यायावर क्लिक केले असता पिंपरी चिंचवड महानगरपालिका - 411 018 कर आकारणी व कर संकलन विभाग यांनी प्रसिद्ध केलेली रक्कम रुपये 1,00,000/- पुढील थकबाकी असलेल्या मिळकतधारकांची यादी दिसेल.
https://www.pcmcindia.gov.in/admin/cms_upload/submission/4431611501582214951.pdf (https://www.pcmcindia.gov.in/admin/cms_upload/submission/4431611501582214951.pdf)
या यादीमध्ये प्रथम स्थानी आहेत -
मे.टाटा मोटर्स लिमिटेड पिंपरी पुणे 411018, रुपये - 710056729 (एक्काहत्तर कोटी छप्पन्न हजार सातशे एकोणतीस फक्त)
द्वितीय स्थानावर आहेत -
मे.टाटा लोकोमोटिव्ह अॅण्ड इंजिनिअरिंग कंपनी पॅसेजर कार युनिट कुदळवाडी, रुपये - 173286584 (सतरा कोटी बत्तीस लाख शहाऐंशी हजार पाचशे चौर्याऐंशी फक्त)
तृतीय स्थान पटकावले आहे - टाटा इंजिनिअरिंग अॅण्ड लोकोमोटिव्ह चिंचवड रुपये - 160971131 (सोळा कोटी नऊ लाख एक्काहत्तर हजार एकशे एकतीस फक्त)
या यादीसोबतच महापालिकेने सूचना लिहिली आहे की, थकबाकीदार मिळकतधारकांनी लवकरात लवकर मिळकत कराची रक्कम भरणा करावी, अन्यथा मिळकत जप्तीची कारवाई करणेत येईल.
प्रत्यक्षात एखाद्या सामान्य नागरिकाने मिळकत कर थकविला तर त्याची मालमत्ता जप्त देखील होते. पण टाटा समूहाच्या वर नमूद केलेल्या तीन आस्थापनांनी गेल्या कित्येक वर्षांत मिळून १०१ कोटींचा मिळकत कर थकविला आहे आणि याशिवाय टाटा इंडिकॉम, टाटा टेलिसर्विसेस, टाटा टेलिकम्युनिकेशन्स या नावांनी नोंदणी असलेल्या शेकडो आस्थापनांनी कोट्यावधी रुपयांचा मिळकत कर थकविला असूनही पिंपरी महानगरपालिकेकडून त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली जात नाहीये.
म्हणजेच रतन टाटा हे साधेसुधे भारतीय नागरिक नसून भारतरत्न असल्याचेच सिद्ध होत नाही का?
No comments:
Post a Comment